भोकर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक कन्या शाळेत कार्यरत सहशिक्षक मिलींद जाधव यांच्याकडून "सृजन वेध ' या शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती करण्यात आली असून त्याचे आज(दि.१९) झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन प्रकाशन जिल्हाशिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर , उपशिक्षणाधिकारी (मा) माधवराव सलगर ,डायट नांदेडच्या प्राचार्या जयश्री आठवले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिव्याख्याते श्रीकांत देशमुख, डॉ.साबळे सर , आदी प्रमुख अधिकाऱ्यासह तालुक्यातील शिक्षण विस्तारअधिकारी एम.जी.वाघमारे .डी.डी.सुपे, मुख्याध्यापक सुधीर सुरंगलळीकर ,केद्र प्रमुख ,जे.एम. शेख.सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ,.शिक्षक, विषयतज्ञ,विशेष शिक्षक यांची उपस्थितीत होती.
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 'शाळा बंद शिक्षण चालू' या उपक्रमावर अधिक लक्ष केंद्रीत केले असून त्यास अनूसरुन गटशिक्षणाधिकारी डॉ.डी एस मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्वपूर्ण शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे . दैनंदिन अभ्यासमाले सह विषय निहाय अभ्यास या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.भविष्यात त्याचा लाभ शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांना होणार आहे .डायट आयटी विभागाचे प्रा.संतोष केंद्रे यांनी या ब्लॉग साठी तांत्रीक सहाय्य केले. दरम्यान हा जिल्ह्यातला पहिलाच उपक्रम असून याचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. या ब्लॉगच्या निर्मितीसाठी कन्या शाळेतील सर्व स्टाफचे सहकार्य मिळाले.
.
Comments
Post a Comment